निलेश राणेंच्या उपस्थित नेरूर विभाग प्रमुखांसहीत,ग्रामपंचायत सदस्य यांचा भाजपामध्ये प्रवेश..

उबाठा गटाला धक्का….

कुडाळ प्रतिनिधी
तालुक्यात उबाठा गटातून भारतीय जनता पक्षात सातत्याने प्रवेश सुरूच असून आज भाजपा नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आज नेरूर उबाठा गटाचे विभागप्रमुख श्री. बाळा पावसकर यांनी नेरूर ग्रामपंचायत सदस्या श्रीमती चव्हाण व इतर सहकारी यांच्या समवेत आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अत्यंत महत्वाचा असून नेरूर मतदारसंघात उबाठा गटाला खिंडार पडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page