शिवसेनेच्या वतीने म्हापणकर कुटुंबीयांना आर्थिक मदत..!
सिंधुदुर्ग प्रतिनिधी
जनतेवर कोणतेही संकट आले कि शिवसेना पक्ष नेहमीच मदत कार्यासाठी पुढे असते. नागरिक संकटात असताना शिवसैनिक शांत बसत नाहीत.
आज झालेल्या मुसळदार पावसाने व वादळी वाऱ्याने घावनळे खुटवळवाडी येथील श्रीमती अन्नपूर्णा वसंत म्हापणकर यांच्या घराचे मोठया प्रमाणात पत्रे उडाले व घराचे व घरातील वस्तूचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले हे समजतात शिवसेना स्थानिक पदाधिकरी उपविभाग प्रमुख श्री पप्पू म्हाडेश्वर, श्री.संतोष नागवेकर, श्री रामा तावडे श्री धर्माजी सावंत, सतिश परब, सुदीप पारकर, शुभम तोरस्कर, उमेश गिरकर, गुरू राणे, संतोष नाईक, विलास नागवेकर, महेश घस्ते, बाळा तोरसकर,यानी तात्काळ तिकडे धाव घेउन मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले ह्याची पाहणी केली आणि घरातली सदस्यांना धीर दिला. तसेच ताबोडतोब कुडाळ उप-तालुका प्रमुख श्री कृष्णा धुरी साहेब यांना फोन करून झालेली परिस्थितीची माहिती मिळताच घटनास्थळी पोचले. आणि पाहणी केली तसेच श्री कृष्णा धुरी साहेब यांनी तात्काळ आपले सर्वांचे लाडके आमदार श्री वैभव नाईक साहेब यांच्याशी संपर्क केला आणि सांगितले आमदार श्री वैभव नाईक साहेबांनी ताबोडतोब पत्रे पाठवुन दिले आणि आजचा आज पूर्ण पत्रे घरावर लावले पाहिजे असे स्थानिक पदाधिकारी यांना सांगितले आणि आर्थिक सहकार्य सुद्धा केले आम्ही नेहमी तुमचा सोबत राहू असे आश्वासन दिले..
*म्हापणकर कुटूंबियानी आमदार साहेब, स्थानिक पदाधिकारी व सहकारी यांचे आभार मानले…*