कांदळगाव ग्रामपंचायत सदस्य विहार कोदे यांची माहिती.
मालवण प्रतिनिधी
तालुक्यातील कांदळगाव शाळा इमारत जीर्ण झाली होती व अतिवृष्टीमुळे या शाळेच छप्पर कोसळून मोठी वित्तहानी झाली होती, यावर निलेश राणे यांनी स्वखर्चाने शाळा छप्पर दुरुस्ती करत लवकरच सुसज्ज इमारत बांधणार असल्याचा शब्द दिला होता, त्या नंतर या वर्षीच्या जिल्हा वार्षिक योजना शाळा बांधकाम अंतर्गत कांदळगाव शाळा दोन वर्गखोली इमारत बांधण्यासाठी २४ लक्ष एवढा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच काम सुरू होईल अशी माहिती कांदळगाव ग्रामपंचायत सदस्य विहार कोदे यांनी दिली. याबद्दल कांदळगाव ग्रामस्थ यांनी खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.