कुडाळ प्रतिनिधी
हुमरमळा वालावल रामेश्वर विद्या मंदिर शाळा बांधकामासाठी साठ वर्षांनी निधी मंजुर केल्याने आज ग्रामस्थांनी भुमीपुजन कार्यक्रम संपन्न झाला असे प्रतिपादन मा पंचायत समिती सदस्य श्री अतुल बंगे यांनी केले!
हुमरमळा वालावल श्री रामेश्वर विद्या मंदिर शाळा नविन बांधकामासाठी आमदार वैभव नाईक यांनी पडोसवाडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार विस लाख रुपयांचा निधी दीला त्याचे भुमिपुजन श्री अतुल बंगे, सरपंच श्री अमृत देसाई,उद्योजक प्रकाश परब, ग्रामपंचायत सदस्य श्री मितेश वालावलकर, ग्रामपंचायत सदस्या सौ संजना गुंजकर, जेष्ठ शिक्षण तंन्य समीती शरद वालावलकर यांच्या हस्ते झाले!
यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या वतीने श्री बंगे यांचा शाल श्रीफळ देऊन ग्रामस्थांनी जेष्ठ ग्रामस्थ श्री शरद वालावलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला!
यावेळी श्री बंगे यांनी सांगितले कि आमदार वैभव नाईक यांनी आम्ही विकासासाठी निधी मागितला तसा निधी दिला म्हणुनच आज हुमरमळा ग्रामपंचायत भव्य दिव्य होत आहे, देसाई वाडा पुल बांधुन पुर्ण झाले,बिजोळे वाडी पुलासाठी १९ लाख निधी दिला,बांधकोंड ते बिजोळेवाडी स्ता ९लाखाचा पुर्ण केला,बिजोळेवाडी साठी ७ लाख रुपयांचा निधी दीला, अशी कितीतरी विकास कामे मार्गी लावली असुन आज साठ वर्षांनी या नविन शाळा बांधकामाचे ग्रामस्थांचे स्वप्न साकार होत आहे त्यामुळे पालकांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले,
यावेळी सरपंच श्री अमृत देसाई यांनी मनोगत व्यक्त केले,हुमरमळा गावातील जेष्ठ उद्योजक मसाला उद्योजक श्री प्रकाश परब, ग्रामपंचायत सदस्य श्री मितेश वालावलकर, ग्रामपंचायत सदस्या सौ संजना गुंजकर,शरद वालावलकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ दीप्ती दयानंद परब, युवा सेना शाखा प्रमुख संदेश जाधव, दत्ता गुंजकर,दिपा गुंजकर,सौ परब, श्री प्रविण मार्गी,पांडु गुंजकर,दाजी चव्हाण,आशु बंगे,आदीती देसाई, मिताली देसाई,भारती परब,राजन कद्रेकर,शेजल गुंजकर,नाथा राणे,भिवा गुंजकर,आदी उपस्थित होते