सिंधुदुर्ग भंडारी महासंघ अध्यक्ष पदी हेमंत करंगुटकर यांची निवड तर,सचिव पदी हेमंत सावंत…

वेंगुर्ला प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिंधुदुर्ग 29 सप्टेंबर रोजी निवड झालेल्या भंडारी नवनिर्वाचित कार्यकारीणी च्या सदस्यांची पहिली महत्वाची सभा महासंघाचे सरचिटणीस विकास वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या वेंगुर्ला येथील
स्वामी प्रसाद कॉम्प्लेक्स,हॉस्पिटल नाका,वेंगुर्ला या कार्यालयात रविवार दिनांक 13.10.2024.रोजी संपन्न झाली.सर्वप्रथम शालिनी अरविंदेकर ,गोडकर,उद्दोजक रतन टाटा,ईतर न्याती आणि अज्ञात न्याती बांधवांना भंडारी समाजाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.त्या नंतर सिंधुदुर्ग भंडारी महासंघ अध्यक्ष पदी देवगड येथील तुकाराम उर्फ हेमंत भिमसेन करंगुटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.तर,सचिव पदी कुणकेश्वर येथील श्री.हेमंत लक्ष्मण सावंत यांची निवड करण्यात आली आहे.

महासंघाच्या कार्याध्यक्ष पदी कुडाळ येथील शेखर (राजू) पुंडलिक गवंडे ,जिल्हा उपाध्यक्ष पदी दोडामार्ग येथील श्री.विठोबा पालयेकर यांची निवड करण्यात आली आणि जिल्हा उपाध्यक्ष पदी कणकवली येथील अनंत उर्फ भाई कांबळी यांची निवड करण्यात आली आहे.तर सहसचिव पदी कुडाळ येथील श्री.भरत आवळे आणि सहसचिव पदी मालवण कट्टा येथील श्री.सुनिल नाईक यांची निवड करण्यात आली आहे.तर खजिनदार पदी वेंगुर्ला येथील श्री.विकास वैद्य यांची निवड करण्यात आली आहे.आणि ईतर सदस्यांची निवड करण्यात आली.

यावेळी वासुदेव उर्फ मामा माडये विकास वैद्य ,दीपक कोचरेकर ,रमण वायंगणकर ,भरत आवळे ,समील जळवी ,आत्माराम बंगे ,शेखर गवंडे,प्रियदर्शन कुडव ,ऍड. नारायण गोडकर ,नामदेव साटेलकर ,सिद्धार्थ पराडकर ,तुकाराम करंगुटकर हेमंत सावंत ,रामदास अनभवणे ,रवींद्र तळाशीलकर ,मोहन गवंडे ,सुनिल नाईक ,विठोबा पालयेकर ,उदय मयेकर ,निलेश गोवेकर अन्य भंडारी समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page