तेली पराभवाची हॅट्रिक करून कणकवलीत परततील:मंत्री दिपक केसरकर
सावंतवाडी प्रतिनिधी
मी महाराष्ट्रात काम करतो, त्यामुळे माझ्यासारख्या मोठ्या माणसाच्या विरोधात उभे राहिल्यास प्रसिद्धी मिळते यामुळे निवडणुकीला उभे राहण्यासाठी राजन तेली यांची धडपड सुरू आहे. मात्र त्यांचा पराभव तिसऱ्यांदा निश्चित असून त्यांचे पराभवाची हॅट्रिक होणार असा टोला मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे लगावला.
दरम्यान राज्याची जबाबदारी असल्यामुळे जनसंपर्कात कमी पडलो मात्र यापुढील हे मी केवळ कोकणासाठी काम करणार आहे. तस मी वरिष्ठांकडे जबाबदारी मागून घेणार आहे, असे केसरकर यांनी स्पष्ट केले. ते सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की आत्ताच्या निवडणूकीत मी उभा राहणार नव्हतो. परंतू मी जिल्ह्यात आणलेली विकासकामे पुर्ण करायची आहेत. आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून कोकण समृध्द करायचा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणूकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी भूमिका राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केली.