शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
कुडाळ (प्रतिनिधी)
कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या माजी आमदार परशुराम उपरकर व राजन तेली यांचा भव्य सत्कार समारंभ कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, शाखाप्रमुख, युवासेना शाखाप्रमुख व सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहण्याचे आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले आहे.
