काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर

भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट

काँग्रेसच अस्तित्व संपवायचा विडा उद्धव ठाकरेंनी उचलल्या मुळे गांधी प्रचंड नाराज

कणकवली प्रतिनिधी
संजय राऊत काँग्रेस आणि उबाठा मधील वादा बद्दल कितीही खोटे बोलला तरी आघाडीत बिघाडी झाली आहे हे जगजाहीर आहे.येत्या 48 तासांमध्ये काँग्रेस पक्ष महत्वाचा निर्णय घेण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे महाविकास आघाडी मध्ये मोठा भूकंप होणार आहे.काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. असा गौप्यस्फोट भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी केला.कणकवलीत प्रहार भवन येथे पत्रकारांशी बोलत होते.
दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये काँग्रेस चे नेते राहुल गांधी यांनी सरळ सरळ नाराजीची भूमिका घेतली. मिटिंग मधून उठून ते गेले.विदर्भ कोकण आणि मुंबईतल्या काही जागांबद्दल उद्धव ठाकरे हे परस्पर पक्षाचे एबी फॉर्म वाटत आहेत. त्याबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रचंड नाराजी आहे. आणि त्यामुळेच पुढच्या दोन दिवसांमध्ये काँग्रेस आपली भूमिका घेईल अशा सरळ स्पष्ट राज्यांच्या नेत्यांना कळविलेला आहे. असे आमच्याकडे माहिती आहे. म्हणून महाविकास आघाडी शेवटचे काही तासाचे राहणार आहे. महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे कोणालाही न विचारता कोणालाही न सांगता कोणालाही न विश्वासात घेता, ए बी फॉर्म वाटताहेत. ज्या जागेवर अजून पर्यंत चर्चा फायनल झालेले नाही.उदाहरण भायखळा, हिंगोली, देवळाली हे मतदार संघ कोणत्या पक्षाला द्यायचे याचा निर्णय झालेला नाही असे अजून कितीतरी मतदार संघ आहेत.ही चार नावे उदाहरण म्हणून दिली.त्या जागेवर अजून पर्यंत आघडी म्हणून निर्णय झालेला नाही. तरीही उद्धव ठाकरेंनी त्याचे एबी फॉर्म आपल्या पक्षाच्या उमेदवारांना दिले आहेत. म्हणजे काँग्रेसला फाट्यावर मारण्याचं काम उद्धव ठाकरे सरळ स्पष्ट करतात.त्यामुळे काँग्रेसचे नेते मंडळी उद्धव ठाकरे बद्दल कुठल्या शब्दात खाजगी मध्ये बोलताय. त्यांना काय उपमा देत आहेत ते अगर जाहीर झालं तर आमच्यासारखे पारंपरिक विरोधकांना पण लाज वाटेल असे त्यांचे ते शब्द आहेत.
काँग्रेस महा विकास आघाडीतून बाहेर निघण्याचा निर्णय 90% झालेला आहे आणि काँग्रेसच अस्तित्व संपवायचा जो विडा उद्धव ठाकरेंनी उचलला त्याबद्दल राहुल गांधीजींना प्रचंड राग आलेला आहे. त्या पद्धतीची भूमिका लवकरच काँग्रेस घेणार आहे अशी खात्री लायक माहिती माहिती आहे.
काँग्रेसच्या सगळ्या कार्यालयांना अधिकृत टाळ मारा अशी परिस्थिती झालेली आहे.जिथे काँग्रेसला कोकणातून अंतुले साहेब सारखे लोक निवडून जायचे, राणे साहेब जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा काँग्रेसची प्रचंड ताकद या कोकणामध्ये होती.त्या काँग्रेसला एक उमेदवार कोकणातून उध्दव ठाकरे देत नाहीत. म्हणून काँग्रेस प्रदेश कार्यालयाकडे लवकरच टाळ्यांचा एक बॉक्स आम्ही पाठवणार आहोत.
राऊत जे मैत्री पूर्ण लढत म्हणतात त्याला खंजीर खुपणसने म्हणतात.
राहुल गांधी यांची ती नाराजी नाही तर काँग्रेस मुळेच उबाठाचे खासदार निवडून आले होते ही लायकी दाखविणारी ती नाराजी होती असे आमदार नितेश राणे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page