आम.नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रहार भवन येथे युवा मोर्चा कार्यकर्ता बैठक
कणकवली प्रतिनिधी
उद्या २७ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक तसेच आयडियाज फॉर विकसित महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात सकाळी १० वाजता येथील प्रहार भवन येथे युवा मोर्चा कार्यकर्ता बैठक अनुप मोरे व आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप व मेस्त्री यांनी दिली.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण, उपाध्यक्ष लखमराजे भोसले, सिंधुदुर्ग प्रभारी स्वप्नील काळे पाटील, सहप्रभारी अक्षय पाठक राहणार उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत विधानसभा निवडणूक व ‘आयडियाज फॉर विकसित महाराष्ट्र’ हा महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार असून, सिंधुदुर्ग किल्ल्यावर श्री. मोरे भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात जाऊन छत्रपतींचे दर्शन घेणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही श्री मेस्त्री यांनी केले आहे