कुडाळ प्रतिनिधी
येथील विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार निलेश राणे हे उद्या सकाळी १० वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
यावेळी खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, महायुती घटक पक्षाचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई जिल्हाध्यक्ष पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कुडाळ मंडळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी केले आहे.
