“आयडीयाज फॉर विकसित महाराष्ट्र” कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचे आवाहन
कणकवली येथे युवा मोर्चाचा प्रचंड प्रतिसादात संपन्न झाला कार्यक्रम
कणकवली प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रत्येक उमेदवार प्रचंड मतानी निवडून आला पाहिजे. यासाठी युवा मोर्चाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध काम करा आणि या निवडणुकी मधील यशात सिंहाचा वाटा उचला असे आवाहन भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी केले.
कणकवली येथील प्रहार भवन च्या सभागृहात “आयडीयाज फॉर विकसित महाराष्ट्र” या भाजपा युवा मोर्चाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष लखमराजे भोसले,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, सिंधुदुर्ग प्रभारी स्वप्निल काळे – पाटील, सहप्रभारी अक्षय पाठक, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संतोष पुजारे, विजय इंगळे, प्रज्वल वर्दम, आदि