सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी हा शांतता प्रिया असा मतदार संघ आहे आणि तो जसा आहे तसाच राहावा यासाठी माझे नेहमीच प्रयत्न असतील आणि याआधी सुद्धा होते. परंतु सावंतवाडी विधानसभा मतदार संघामध्ये एकच नाही तर दोन दोन अपप्रवृत्ती घोंगावत आहेत.. आणि या अपप्रवृत्तीच्या विरोधात जनतेच्या हिताच्या दृष्टीने माझे नेहमीच प्रयत्न असतील. या अपप्रवृत्तीच्या विरोधात माझा नेहमीच संघर्ष राहील आणि यात जनता देखील मला साथ देईल..
निवडणुकीत या अपप्रवृत्तींना माझी जनता त्यांची योग्य जागा दाखवेल आणि त्यांना त्यांच्या मूळ गावी पाठवून देईल. असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला..
काहीजण सध्याच्या क्षणी जेलमध्ये असू शकले असते, परंतु आचारसंहितेत अटक झाली असती तर जाणून बुजून अटक केल्याचा आरोप होऊ शकला असता.. परंतु त्यांची ही अटक निवडणुकीनंतर निश्चितच आहे असे केसरकर यांनी सांगितले..
राज्याचा शालेय शिक्षण मंत्री म्हणून आपण वेगळी क्रांती
घडवून आणली. अनेक शिक्षकांचे अनेक प्रश्न देखील मार्गी
लावले. मंत्रिपदाची मोठी जबाबदारी माझ्यावर असल्याने
