आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत..!
कणकवली (प्रतिनिधी)
जाणवली बौद्धवाडी येथील उबाठा सेनेचे शाखाप्रमुख प्रमुख प्रवीण कदम व युवासेना शाखाप्रमुख निलेश पवार व उपशाखाप्रमुख स्वप्निल पवार, चैतन्य पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत येथील ओम गणेश निवासस्थानी प्रवेश केला. यावेळी आ. नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उबाठा सेनेला या पक्ष प्रवेशामुळे मोठा धक्का मानला जात आहे.
यावेळी भाजपा पदाधिकारी मिलिंद मेस्त्री, रंजन राणे,संदीप सावंत राजू हिरलेकर, सरपंच अजित पवार, प्रशांत राणे नयन दळवी समीर प्रभू गावकर, स्वप्निल चिंदरकर व पदाधिकारी उपस्थित होते.