अनिष्ट प्रवृत्तींचा नाश श्रीकृष्णाने केला;मंत्री दीपक केसरकर
सावंतवाडी प्रतिनिधी
विठूरायाने नेहमीच माझ्या पदरी यशाचं दान टाकले आहे. त्यामुळे शेतकरी, महिला, नागरिकांच्या हिताच रक्षण करण्याची ताकद विठूरायाने देवो. अनिष्ट प्रवृत्तीला सावंतवाडीत प्रवेश न मिळता सावंतवाडीकरांच कुटुंब सुखानं नांदो असं मागणं महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी विठूरायाकडे केलं. दीपावली निमित्त त्यांनी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात भेट दिला. त्यावेळी ते बोलत होते.
केसरकर म्हणाले, अनिष्ट प्रवृत्तींचा नाश श्रीकृष्णाने केला अन् पृथ्वीवर शांती आणली. याचप्रमाणे कोणत्याही अनिष्ट प्रवृत्तीला सावंतवाडीत प्रवेश न मिळता सावंतवाडीकरांच कुटुंब सुखान नांदो यासाठी विठ्ठलाकडे प्रार्थना केली. मतदारसंघातील नागरिकांची भरभराट होऊन अडीच वर्षांत चांगली सेवा करणार युती सरकार पुन्हा सत्तेत येवो असे मागणं केल. सावंतवाडी शहर, विधानसभा मतदारसंघासह, राज्यात सुख, समृद्धी नांदो अशी मागणी करत दीपक केसरकर यांनी सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सावंतवाडीतील नागरिक उपस्थित होते.