शेतकऱ्याने एक झाड तोडल्यास पन्नास हजार रुपयांचा दंड या शासन निर्णयाबद्दल मंत्री केसरकर यांचे वारंवार लक्ष वेधूनही दखल न घेतल्याने 23 तारीखला “आमदार बदलो” शेतकरी मेळाव्यात मंगेश तळवनेकर यांनी घेतली भूमिका
सावंतवाडी प्रतिनिधी
एक झाड तोडल्यास पन्नास हजार रुपयांचा दंड या शासन निर्णयाबद्दल वारंवार मंत्री केसरकर यांचे लक्ष वेधून देखील दखल न घेतल्याने 23 तारीख ला आमदार बदलो नाहीतर राजकारणातून संन्यास घेणार असे मोठे घोषणा मंगेश तळवणेकर यांनी गांधी चौक येथील शेतकरी मेळाव्यात केल्यानंतर अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी त्याची त्वरित दखल घेत मंगेश तळवणेकर यांच्याशी त्यांनी फोन द्वारे संभाषण करून आपण निवडून आल्यावर विधिमंडळात शेतकऱ्यांवर झालेल्या अन्याया विरोधात पहिला आवाज उठवणार असा शब्द मंगेश तळवणेकर यांना विशाल परब यांनी दिला. त्यामुळे आता मंगेश तळवणेकर यांनी जो शब्द देईल त्याच्या पाठीशी आम्ही असे म्हणत आपली पुढील रणनीती काय आखतात याकडे आता संपूर्ण मतदारसंघातील लक्ष लागून राहिले आहे.
