अर्चना घारे परब मी कोणावरही नाराज नसून वरीष्ठांनी मला खूप प्रेम दिलं परिवर्तन घडविण्यासाठी मी रणांगणात
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बंडखोर नेत्या अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांनी व्यक्त केला आहे. उद्या पासून आपण प्रचाराला सुरुवात करणार असून, जनतेचा मला नक्कीच चांगला पाठिंबा मिळेल असा विश्वास देखील त्यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.
यावेळी त्या पुढें बोलताना म्हणाल्या की, गेल्या 15 वर्षात हा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला असून, आता परिवर्तन घडविण्यासाठी मी रणांगणात उतरले असून, माझ्यावर जनता विश्वास नक्की ठेवेल आणि मला विजयी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच मी कोणावरही नाराज नसून, वरिष्ठांनी मला खूप प्रेम दिलं असल्याचे देखील जाहीर केले. यावेळी आपल्याला पाकीट हे निशाण मिळाले असून, त्या समोरील बटन दाबून आपल्याला विजयी करा असे आवाहन देखील त्यांनी जनतेला केले आहे.
यावेळी पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, हिदायतुल्ला खान, याकुब शेख, संजय भाईप, विनायक परब, संतोष जोईल, नवल साठेलकर, ऋत्विक परब, विवेक गवस, अवधूत मराठे, साबाजी रेडकर, निलेश गावडे, नोबर्ट माडतीस, पंढरी राऊळ आदी उपस्थित होते.