गोळवण मध्ये श्री देव रवळनाथ मंदिरात श्रीफळ वाढवून आ.वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ..

‘बा!! देवा महाराजा,
वैभवचो सांभाळ करुन तेंका मोठ्या मताधिक्य्यान निवडून हान रे महाराजाsss… !!’

मालवण प्रतिनिधी
तालुक्यातील गोळण येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज सकाळी ९.३० वा गोळवणचे ग्रामदैवत मंदीर श्री. देव रवळनाथ मंदिरात गोळवण शिवसैनिकांच्या उपस्थित नारळ फोडून व श्री देव रवळनाथ च्या चरणी ‘बा!! देवा महाराजा,वैभवचो सांभाळ करुन तेंका मोठ्या मताधिक्य्यान निवडून हान रे महाराजाsss…!!अस साकड घालून करण्यात आला. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी “वैभव नाईक आगे बढो,हम तुम्हारे साथ है”, निष्ठेचे पाईक वैभव नाईक अशा जोरदार घोषणा देत प्रचाराचा शुभारंभ केला.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रिय उमेदवार आमदार वैभव नाईक यांना विधानसभेच्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया असा समस्त शिवसैनिकांनी निर्धार केला आहे.
यावेळी उपविभाग प्रमुख भाऊ चव्हाण,माजी सरपंच प्रज्ञा चव्हाण,रामु परब,मानकरी अरुण घाडी,मुरारी गावडे, दिगंबर सावंत,अक्षय दाभोळकर, एकनाथ चव्हाण,हेमंत परब,आजा सावंत,गुरुनाथ पालव,वसंत परब, संदीप नाईक आदीओम लाड,मंगला चिरमुले,पुष्पा चिरमुले,आजोबा सावंत,तुळाजी घाडीगावकर आप्पा चिरमुले,विठोबा दाभोळकर,शेखर घाडी,राजेंद्र गावडे हरिश्चंद्र गावडे,महादेव पवार,नामदेव गावडे,धनाजी चिरमुले आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page