सावंतवाडी वैश्य भवन येथे सावंतवाडी तालुका मागासवर्गीय सेल,शिवसेना,भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस आदी घटक पक्षाचा मेळावा संपन्न
सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघा मध्ये मागासवर्गीय वस्तीमध्ये विकासात्मक कामे करण्यात आली आहेत.मागासवर्गीय बांधवांनी आपली एकी कायम ठेवावी. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील. प्रत्येक मागासवर्गीय वस्तीमध्ये
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारकरुपी पुतळा बसवण्यात येणार आहे आहे. पुढील पिढीला बाबासाहेबांचे विचार व संविधानाचा जागर घराघरात पोहोचावा असे आपले धोरण आहे. असे महायुतीचे उमेदवार राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी मेळाव्यात स्पष्ट केले.
सावंतवाडी वैश्य भवन येथे सावंतवाडी तालुका मागासवर्गीय सेल, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आदी घटक पक्षाचा मेळावा घेण्यात आला यावेळी ते बोलत होते. महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याच्या फरकाने विजयी करण्याचा निर्धार यावेळी मागासवर्गीय सेलच्या वतीने करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर मागासवर्गीय सेलचे तथा दलित मित्र पुरस्कार विजेते गुंडू जाधव, माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, चंद्र जाधव जिल्हा चिटणीस भाजप सिंधुदुर्ग. लाडू जाधव., सोनिया
मटकर, तानाजी कुणकेरकर, गुरु कासले, अक्षय जाधव, सुरेश कदम, अथर्व जाधव, नारायण कराडकर, उमेश मटकर, स्वप्निल मटकर, आधी उपस्थित होते. यावेळी श्री केसरकर पुढे म्हणाले मी या भागाचा विकास केला आहे. त्यामुळे मला साथ द्या असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.