आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश
कणकवली प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील महाळूंगे येथील कट्टर उबाठा शिवसैनिक व तंटामुक्त गाव अध्यक्ष सुमित राणे यांचा भाजप पक्षांमध्ये प्रवेश केला.
आमदार नितेश राणे यांनी मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज या सुविधा मार्गी लावल्या. विकासाचा झंजावात म्हणजे काय हे आमदार नितेश राणे यांनी दाखवून दिले. असे सुमित राणे यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार अजित गोगटे, भाजपा पदाधिकारी बाळा खडपे संदीप साटम, बंड्या नारकर अमोल तेली आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.