श्री देव पाटेकरला श्रीफळ ठेवून दीपक केसरकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ…

सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज सावंतवाडीचे श्री देव पाटेकर मंदिरात श्रीफळ ठेवून करण्यात आला. राज्यात महायुतीची पुन्हा आता स्थापन होऊन जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त व्हावी, असे साकडे यावेळी पाटेकर चरणी नतमस्तक होत घालण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, कणकवली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे, युवराज लखमराजे भोंसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पेट्रोलियम महामंडळाचे अध्यक्ष अतुल काळसेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक संजू परब, महेश सारंग, विधानसभाप्रमुख प्रेमानंद देसाई, महिला आघाडी प्रमुख अॅड. निता कविटकर, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगांवकर यांसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित महायुतीच्या नेत्यांनी दीपक केसरकर हे या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी होत विजयी चौकार करतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह आ. नितेश राणे यांनीही मंत्री दीपक केसरकर यांचा विजय निश्चित असून महायुतीचे सर्व पदाधिकारी एकसंघपणे प्रचार कार्यात सहभागी झाले असल्याने या मतदारसंघात महायुतीला मोठे मताधिक्य मिळेल असे स्पष्ट केले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बबन राणे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, भाजपचे शहराध्यक्ष अजय गोंदावळे, मंदार नार्वेकर, अंकुश जाधव, माजी उपनगराध्यक्षा अनारोजीन लोबो, माजी नगरसेवक राजू बेग, सुधीर आडिवरेकर, अॅड. परिमल नाईक, उदय नाईक, संजय पेडणेकर, सुरेंद्र बांदेकर, भारती मोरे, शुभांगी सुकी, गुरुनाथ सावंत, परिक्षीत मांजरेकर, विनोद सावंत, सूरज परब, विनायक दळवी यांसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page