मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले पक्षात स्वागत
सावंतवाडी (प्रतिनिधी)
सावंतवाडी तालुक्यातील शिरोडा गावच्या सरपंच सौ लतिका रेडकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून शिंदे शिवसेनेत प्रवेश केला मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.त्यामुळे शिरोड्यात ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच असल्यामुळे हा उबाठाला मोठा धक्का मानला जात आहे यावेळी दीपक केसरकर यांनी शिरोडा गावच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असून यापुढे आपल्या माध्यमातून गावातील समस्या सोडवल्या जातील असे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक संजू परब, तालुका प्रमुख नारायण राणे, सुनील डूबळे ग्रामपंचायत सदस्य मयुरेश शिरोडकर शिवसेना ग्रामपंचायत सदस्य जगन बांदेकर आदी उपस्थित होते.
