सावंतवाडी प्रतिनिधी
आज अर्चना घारे परब या सावंतवाडी तालुक्यातील गावांमध्ये निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान गावभेट दौऱ्यावर होते. यावेळी सातुळी गावातील वेगवेगळ्या समाजातील महिलांनी आपल्या गावात वाडी वस्तीमध्ये जाण्या येण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही , दळण वळणाची कोणतीही साधने नाहीत , महिलांना पाण्यासाठी खूप आटापिटा करावा लागतो आहे , मुलांना शाळेच्या असंख्य समस्यांना सामोरे जात शिक्षण घ्यावे लागते आहे , शाळांच्या झालेल्या दुरवस्था , आज आपल्या सिंधुदुर्ग मधील मुले ही सर्व क्षेत्रात उच्च असून देखील मुलांना या ठिकाणी रोजगार नसल्या मुळे आपली सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र घेऊन वणवण भटकाव लागते आहे. आपल्या घरा पासून , गावा पासून आपल्या कुटुंबा पासून लांब आहेत याच दुःख बोलून दाखवले तेव्हा उपस्थित महिलांच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहून सर्वसामान्य जनतेचे उमेदवार सौ.अर्चना घारे परब हे बोलताना म्हणाले की आजचे हे तुमच्या डोळ्यात आलेले अश्रू पुसण्याची मला एक संधी द्या अस बोलाच क्षणी अर्चना घारे परब यांना देखील अश्रू अनावर झाल्या.