सावंतवाडीत दिव्यांगन बांधवांचा निर्धार…
सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील दिव्यांगन बांधवांचा गेल्या अनेक वर्ष रखडलेला प्रश्न सोडवण्याचा शब्द अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी आम्हाला दिला त्यामुळे, आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत. विशाल परब यांच्या शेगडी या चिन्हाचा प्रचार करून आम्ही त्यांना प्रचंड मतांनी निवडुन आणणार आहोत. त्यांना मोठ्या मताधिक्य देऊन निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. असा निर्धार सावंतवाडी मतदारसंघातील दिव्यांग बांधवांनी आज येथे केला. दरम्यान गेल्या पंधरा वर्षे दिव्यांगण बांधवांचा प्रश्न सोडवण्यात दीपक केसरकर यांनी लक्ष दिलं नाही त्यांनी कधीही आमची विचारपूस देखील केले त्यामुळे आम्ही आता हा बदल घडून आणून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा आम्ही ठरवल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
