सावंतवाडी प्रतिनिधी
युवा नेते तथा अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी आज सकाळी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी चराठे येथील जिल्हा परिषद शाळेत सपत्नीक मतदान केले. दरम्यान गेले ६ महिने आपण अनेक प्रसंगातून गेलो. तरीही येथील जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. त्यामुळे माझा विजय निश्चितच आहे, असा दावा श्री. परब यांनी केला.
आज मतदानाच्या दिवशी सकाळीच श्री. परब यांनी आपल्या गावातील प्रमुख गावकऱ्यांसह मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी पत्नी वेदिका परब, अमित परब, ओंकार पावसकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की लढाई सावंतवाडीच्या विकासासाठी आहे त्यामुळे येथील जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे. मी रोजगार आरोग्य या दोन प्रमुख गोष्टी डोळ्यासमोर ठेवून मतदार संघात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मच्छीमारांचे प्रश्न तसेच महिला व युवकांचे प्रश्न सोडवण्याकडे माझे प्राधान्य असणार आहे. त्यामुळे काही झाले तरी माझाच विजय होणार 23 तारखेचा गुलाल मीच उधळणार असा दावा यावेळी त्यांनी केला
