पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी पक्षाची यंत्रणा विशाल परब यांच्या पाठीशी उभी करण्याचे दिले आदेश!
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी भरलेले श्री विशाल परब यांना सर्वसामान्य जनतेचा वाढता पाठिंबा मिळत असतानाच आज वंचित जनतेसाठी काम करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीनेही त्यांना आपला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. वंचितची सावंतवाडी मतदारसंघात चांगलीच पकड असून निर्णायक मते त्यांच्याकडे आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मा. रेखाताई ठाकूर यांनी आदेश देत पक्षाची यंत्रणा विशाल परब यांच्या विजयासाठी राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार व आदेशानुसार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात वंचित चे कार्यकर्ते जोरदार कामाला लागले असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री महेश परुळेकर यांनी सांगितले. महेश परळकर हे स्वतः जातीनिशी प्रचार यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत. आज सावंतवाडी मध्ये ते आपली पत्रकार परिषद घेणार असल्याचे समजते.