वनशक्ती संस्थेचा उपक्रम; भारतातील पहिली समुद्रतळ स्वच्छता मोहीम…
कुडाळ, ता. २८: सागरी परिसंस्थेच जतन करण्याच्या हेतून वनशक्ती
संस्थेतर्फे मालवणात समुद्रतळ स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ही भारतातली पहिली मोहीम असल्याचा दावा वनशक्ती संस्थेचे संचालक पर्यावरणतज्ज्ञ डॉ. स्टॅलिन दयानंद यांनी केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, भारतीय मत्स्य सर्वेक्षण, मुंबई, नीलक्रांती संस्था आणि युथ बीट फॉर एनव्हारमेंट यांच्या सहकार्यान हि मोहीम राबविण्यात आली. स्थानिक स्वयंसेवक, पर्यावरणवादी आणि सागरी तज्ज्ञांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे समुद्रतळातून २५० किलोग्रॅमपेक्षा जास्त जैवविघटनशील नसलेला कचरा काढण्यात आला.
या मोहिमेत वरिष्ठ शास्त्रज्ञ अशोक कदम, रविंद्र मालवणकर, यूएनइपी चे को ऑर्डिनेटर रोहित सावंत, एमपीसीबी चे आर ओ जयवंत हजारे, एसआरओ प्रमोद माने, नीलक्रांती संस्थेचे रविकिरण तोरसकर, रुपेश प्रभू आदी सहभागी झाले होते. तसेच जगदीश तोडणकर, सुजित मोंडकर, नुपूर तारी, भूषण जुवाटकर, जितेंद्र शिर्सेकर, राजू मोरजकर, वसंत येरम, रुपेश प्रभू आणि रोहित सावंत हे स्कुबा डायव्हर्स या मोहिमेत सहभागी झाले होते. यावेळी बाबी जोगी, श्रमिक मच्छीमार संघ. दादा वेंगुर्लेकर, मातृत्व आधार संस्था, सौरभ ताम्हणकर युथ फॉर बिट्स, चारुशीला देवलकर, कु. मेगल, स्वाती पारकर, दर्शन वेंगुर्लेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. मालवण नगरपरिषद व वनखात्याचे या मोहिमेला मोलाचे सहकार्य मिळाले.