काॅमन रिव्ह्यू मिशन पथकाने जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना दिली भेट..

ओरोस प्रतिनिधी
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मार्फत १६ व्या कॉमन रिव्ह्यू मिशन पथकाने जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांना भेट देवून आरोग्य कार्यक्रमांचे अंमलबजाणीचा आढावा घेतला.

यावेळी पथक प्रमुख सहसंचाल डॉ. विनय गर्ग यांचे स्वागत कोल्हापूर विभागीय उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी केले. जिल्ह्यातील आरोग्य निर्देशकांच्या बाबत विस्तृत माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. या पथकामार्फत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पणदूर, आरोग्य उपकेंद्र वेताळ बांबर्डे, महिला व बाल रुग्णालय कुडाळ, प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा, आपला दवाखाना कुडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे भेट देऊन आरोग्य विषयक कार्यक्रमांचा आढावा घेतला. या पथकामध्ये डॉ. सचिन कुमार पाटील, डॉ. आक्रम खान डॉ. अभय दहिया, डॉ. मनीषा शर्मा, डॉ. बिजय कुमार मलिक यांचा समावेश आहे. या टीमने २६ ते २९ नोव्हेंबर दरम्यान आरोग्य संस्थांना भेटी देणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page