सिंधुदुर्ग प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरक्षा व सुरक्षितता या उपक्रमाचे जिल्हास्तरीय केंद्रप्रमुखांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. हा उपक्रम महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई व स्किल ट्री कन्सल्टिंग लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद संचालक श्रीम. आर विमला मॅडम (IAS) यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व जिल्ह्यामंध्ये राबविण्यात येत असून या प्रशिक्षण उपक्रमाचा एक भाग म्हणून मा. श्री. डॉ गणपती कमळकर साहेब सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या सूचनेप्रमाणे बुधवार दिनांक २७/११/२०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुखांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे संपन्न झाले असून मा. श्री. डॉ गणपती कमळकर (शिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प. सिंधुदुर्ग), मा श्रीम. स्मिता नलावडे (समग्र जिल्हा समन्वयक) तसेच प्रमुख वक्ता मा.श्री. ऍड संदेश तायशेटे (अध्यक्ष, बाल कल्याण समिती सिंधुदुर्ग) इ. मान्यवरांच्या उपस्थितीत प्रशिक्षण घेण्यात आले. सदर प्रशिक्षणा दरम्यान शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा आणि सुरक्षितता या प्रशिक्षण उपक्रमाचा जिल्हातील सर्व शाळांमधील शिक्षक व विध्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा शालेय व दैनंदिन जीवनामध्ये याचा उपयोग होईल अशी