सलग 7 व्या वर्षी आयोजन
सावंतवाडी प्रतिनिधी
श्री सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ,सावंतवाडी, व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने व सद्गुरु संगीत विद्यालय सावंतवाडी चे संचालक गुरुवर्य श्री निलेश मेस्त्री यांच्या निर्मिती व संकल्पनेतून सलग सातव्या वर्षी खास त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त _”हे चांदणे फुलांनी…”_ जुन्या – नव्या हिंदी व मराठी गीतांचा व चित्रपट गीतांचा सदाबहार नजराणा व नृत्याविष्कार या कार्यक्रमाचे आयोजन सावंतवाडी येथे करण्यात आले. सदर संगीत मैफील त्रिपुरारी पौर्णिमेला दिनांक 15 नोव्हेंबर रोजी होणार होती, परंतु अवकाळी पावसामुळे गुरुवार दि. 28 नोव्हेंबर रोजी जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान सावंतवाडी (गार्डन) येथे ही मैफिल संपन्न झाली. कार्यक्रमाच्या निर्मितीसाठी नामदार दिपकभाई केसकर मित्रमंडळ, Axis बँक शाखा – सावंतवाडी व खोर्जुवेकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष श्री बबन साळगावकर, माजी उपनगराध्यक्ष श्री राजन पोकळे, सैनिक पतसंस्थेचे कार्याध्यक्ष श्री सुनील राऊळ, श्री दिनकर परब, श्री सोमा सावंत, श्री प्रताप परब, श्री हेमंत खानोलकर, आरवली वेतोबा देवस्थान अध्यक्ष श्री जयवंत राय, माजी सभापती रवी मडगावकर, मालवणी कवी दादा मडकईकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
सौ. वर्षा देवण – धामापुरकर, ॲड. सिद्धी परब, कु केतकी सावंत, कु मधुरा खानोलकर,सौ अनामिका मेस्त्री, सौ पूजा दळवी, सौ मानसी वझे, कु. नेहा दळवी, कु सानिका सासोलकर, कु. निधी जोशी, श्री नितिन धामापूरकर, श्री भास्कर मेस्त्री, कु सर्वेश राऊळ, यांनी एकापेक्षा एक सरस गीते सादर करत रसिकांना खिळवून ठेवले व कु चिन्मयी मेस्त्री, कु. अलीशा मेस्त्री, कु मुग्धा पंतवालावलकर, कु. ऋतुजा परब, कु श्रेया म्हालटकर, कु. स्नेहल बांदेकर, कु. तन्वी दळवी कु. कर्तव्य बांदेकर, कु. विभव विचारे, कु.कैवल्य बर्वे बालचमुच्या विशेष सादरीकरणाने सर्व रसिकांचे लक्ष वेधून घेतले तर सौ. पूजा सावंत – राणे व कु. अनुप्रिया राणे यांच्या नृत्याने कार्यक्रमास अधिकच रंगत आली.
या कार्यक्रमाला साथसंगत श्री निलेश मेस्त्री (हार्मोनियम), श्री किशोर सावंत व कु सिद्धेश सावंत, कु निरज मिलिंद भोसले (तबला), श्री अश्विन (गुड्डू) जाधव (ऑक्टोपॅड), कु. मंगेश मेस्त्री, (सिंथेसायझर), कु.दुर्वा किशोर सावंत (गिटार) यांनी केली तर श्री संजय कात्रे यांनी आपल्या विशेष व अभ्यासपूर्ण शैलीमध्ये निवेदनाची धुरा सांभाळली व ध्वनीव्यवस्था श्री सर्वेश पिंगुळकर व सहकारी (J.S. साऊंड) यांनी सांभाळली.
या मैफिलीस ज्येष्ठ रंगकर्मी वसंत उर्फ भाऊ साळगांवकर, श्री पुंडलिक दळवी, श्री नंदू शिरोडकर,श्री किरण सिद्धये, ऍड. अरुण पणदुरकर, प्रियोळकर सर, श्री वैजनाथ देवण, चंद्रकांत घाटे, नित्यानंद आठल्येकर, वीरेंद्र आठल्येकर, शंकर प्रभु, सौ. उत्कर्षा मेस्त्री, श्रीम. मानसी भोसले, सौ.अर्चना वझे, सौ. प्राची दळवी, सौ.अनघा रामाणे यांच्या सह अनेक मान्यवर मंडळीनी व जिल्हाभरातील रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेवटच्या सादरीकरणापर्यंत कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी साळुंखे साहेब, श्री.श्रीकांत जोशी, कु. गोविंद माळगावकर, कु. मनिष पवार, श्री हेमंत खानोलकर, श्री सोमा सावंत,श्री तानाजी सावंत इ. यांचे विशेष सहाय्य लाभले.