देवगड प्रतिनिधी
विधानसभा निवडणूक झाल्यानंतरची ही पहिलीच सभा होती. या सभेत विधानसभा निवडणूकीचा आढावा घेण्यात आला. पराभवाने खचून न जाता नव्या उमेदीने पक्ष संघटना बळकट करण्याचा निर्धार यावेळी सर्वच उपस्थितांनी केला. ग्राम पातळीवर पक्ष संघटना बळकट करण्यासाठी रणनिती ठरविण्यात आली. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, सरचिटणीस विनायक उर्फ बाळू मेस्त्री, माजी पंचायत समीती सभापती राजाराम राणे, जेष्ठ नेते बबन घाट्ये यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी, युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, सुगंधा साटम,राजाराम राणे, बबन घाट्ये,तुषार भाबल, सजाऊद्दीन सोलकर, सुबोध आचरेकर, गणपत वालकर, बंड्या मेस्त्री, विनायक म्हापसेकर, सुरज घाडी,प्रवीण मोरे, सिताराम आरेकर, खालीद बगदादी, बाळकृष्ण चव्हाण,अभिमन्यू चव्हाण, दिनानाथ राणे, भरत मोंडकर,मुख्तार भाटकर, सिराज भाटकर, दशरथ मेस्त्री, सागर पुजारे, अजिम चौगुले, शराफत खान इत्यादी उपस्थित होते.