सामाजिक कार्यकर्ते रविकमल सावंत यांनी मनःपूर्वक आभार मानले
सावंतवाडी
तालुक्यातील कलंबिस्त गणशेळवाडी येथील भिकाजी सखाराम सावंत (म्हातु) यांची पत्नी लक्ष्मी भिकाजी सावंत हि गेली दिड ते दोन वर्ष दुर्धर आजाराशी झुंज देत आहे. तरी या तिच्या आजारासाठी सोशलमिडीया व्दारे मारलेल्या हाकेला दाद देत दोन लाखाहून अधिक आर्थिक मदतीचा हात देत एकजुटीचे सुंदर उदाहरण देऊन कलंबिस्त ग्रामस्थ, वेर्ले ग्रामस्थ, इतर गावातील दाते, मुबंई , पुणे येथील मंडळी, कलंबिस्त गावतील भजन मंडळे व इतर मंडळे, सहकारी संस्था, वेर्ले गावातील मित्र मंडळे, आजी-माजी सैनिक, सर्व सामाजिक कार्यकर्ते, ऑन कॉल रक्त दाते संस्था तसेच ज्ञातअज्ञात या सर्वांचे कलंबिस्त गावातील सामाजिक कार्यकर्ते रविकमल सावंत यांनी भिकाजी सावंत आणि कुटुंबीयांतर्फे मनपूर्वक आभार मानले व असे आर्थिक संकट कोणावरही येऊ दे आपण सगळे असेच एक जुटीने उभे राहू, असे ही ते म्हणाले.