खाऊ गल्ली नव्हे तर एक प्रकारची जत्राच:आमदार नितेश राणे

आ.नितेश राणेंनी मानले उपस्थितांचे आभार, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व सहकाऱ्यांचे केले कौतुक..

कणकवली प्रतिनिधी
कणकवलीतील बच्चे कंपनीसाठी रविवारची सायंकाळ यादगार ठरली. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने गणपती सान्यावर ‘एक दिवस छोट्यांचा’ अर्थातच खाऊ गल्ली या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. विविध प्रकारचे खाद्य पदार्थ, विविध खेळ – खेळणी, मिकी माऊस, कार्टून्स, जादूगार प्रसाद यांचे जादूचे प्रयोग सोबत संगीत, नृत्य, किलबिल जल्लोष या साऱ्याचा मनमुराद आनंद लुटत लहान मुलांनी अक्षरशः धम्माल केली.

खाऊ गल्ली कार्यक्रमाचे उद्घाटन आ. नीतेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी आ. नितेश राणे यांनी या उपक्रमाबद्दल माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले.

खाऊ गल्ली उपक्रमामुळे टेंबवाडी रस्ता ते गणपती सान्यापर्यंत संपूर्ण परिसर गर्दीने गजबजून गेला होता. अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील दुतर्फा लागले होते. त्याचबरोबर विविध प्रकारच्या

वेळण्यांची दुकानेही होती. बच्चे कंपनीसाठी खास

Let’s chat! ड्या, झोपाळे असे विविध

प्रकारचे खेळ होते. लहान मुलांना आनंद, मज्जा

मस्ती करता यावी यासाठी काही वर्षापासून
सातत्याने समीर नलावडे मित्र मंडळाच्यावतीने खाऊ गल्ली उपक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षीही या उपक्रमाला लहान मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत, माजी नगरसेवक अभि मुसळे, किशोर राणे, संजय कामतेकर, बंडू गांगण, रवींद्र गायकवाड, अण्णा कोदे, मेघा गांगण, कविता राणे, सुप्रिया नलावडे, प्राची कर्पे, साक्षी वाळके, संजना सदडेकर, प्रतीक्षा सावंत, सिंधुदुर्ग बँक संचालक विठ्ठल देसाई आदी उपस्थित होते.

रविवारी सायंकाळी गणपतीसाना परिसर लहान मुलांच्या किलबिलाटाने गजबजून गेला होता. उद्घाटनापूर्वी लहान मुलांनी पन्नास रुपयाचे कुपन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मुलांनी विविध खेळ खेळून कार्टून सह सेल्फी पॉईंटवर रेंगाळत खाऊ गल्लीतील खाद्यपदार्थांचा आनंद लुटला. मिकी माऊस, छोटा भीम, डोरेमॉन अशी कार्टून्सने लहान मुलांना चॉकलेट देऊन त्यांच्यासोबत धम्माल केली. लहान मुलांना प्रश्न विचारून त्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. त्याचप्रमाणे मुलांसाठी लकी ड्रॉ काढून बक्षिसेही दिली.

वेळा आमदार नितेश राणे यांनी उपस्थित पालकांचे आभार मानले. कणकवलीकरांनी समीर नलावडे मित्रमंडळ व त्यांचे कार्यकर्ते, सहकारी कणकवलीकरांची निस्वार्थी स्ववा सातत्याने करत आलेले आहेत. कणकवलमध्ये आजूबाजूला जर पाहिलं तर कणकवलीत बदल झालेले जरूर दिसत आहेत. कणकवली व जाणवली जोडणारा पूल, बारमाही वाहणारा धबधबा, याचा अनुभव घेत असताना मतदार, नागरिक म्हणून घेत असताना हा बदल कोणामुळे झाला कोण आपली सेवा करत आलेले आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे.

आजच्या परिस्थितीत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांच्या सहकाऱ्यांकडे कोणतंही अधिकृत पद नाही तरीही ते सेवा करत आहेत. त्यांनी दिलेला शब्द या कणकवलीचा चेहेरा मोहरा आम्ही बदलून दाखवू जो शब्द दिलेला तो कृतीतून पूर्ण करून दाखवला आहे. याबद्दल त्यांचा मला सार्थ अभिमान आहे. कणकवलीत दाखवण्यासारखे भरपूर काही आहे. कणकवली मध्ये आहे ते अन्य कोणत्याही शहरात नाही हे आम्ही हक्काने सांगतो. म्हणूनच खाऊगल्ली सारखी अतिशय उत्कृष्ट संकल्पना राबविली. काही महिन्यानंतरच नगरपंचायत ची निवडणूक आहे. विकास कामांच्या दृष्टीने उणूक बिनविरोध द्यायला काहीही
हरकत नाही.त्यामुळे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी अर्ज भरावा आणि थेट त्या खुर्चीवर जाऊन बसावं निवडणूक लढवायची गरजच पडणार नाही एवढी विकास काम आपण केली आहेत. अशा शब्दात आमदार नितेश राणे उपस्थित यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page