अ.भा विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयाचे माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सावंतवाडीत उद्घाटन

सावंतवाडी प्रतिनिधी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५९ वे वार्षिक अधिवेशन सावंतवाडीत होत आहे. या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण व माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कोकणातील प्रश्नांवर विचार मंथन होणे गरजेचे

यावेळी बोलताना रविंद्र चव्हाण म्हणाले, अखंड भारताचे स्वप्न पुढे न्यायचे असेल तर तरुणांनी विद्यार्थी दशेतच प्रामाणिकपणे काम केले पाहिजे, असे आवाहन केले. दरम्यान सिंधुदुर्गात प्रथमच होणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनाच्या माध्यमातून कोकणातील प्रश्नांवर विचार मंथन होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी रविंद्र चव्हाण पुढे म्हणाले, या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राष्ट्र भक्ती शिकवली जात आहे. तरुणाईंना आपल्या इतिहासाचा विसर पडू नये यासाठी काम सुरू आहे. या कार्यात युवाई मोठ्या प्रमाणात सहभागी हो आहे. ही कौतुकाची गोष्ट आहे. सावंतवाडीत अधिवेशन निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात राष्ट्रप्रेम आणि

कोकणचा विकास या विषयावर विचार मंथन व्हावे.
प्रेमाची भावना जागृत होत आहे

यावेळी आ. दीपक केसरकर यांनी शुभेच्छा दिल्या.
ते परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्र प्रेमाची भावना जागृत केली जाते. त्याचा फायदा भविष्यातील पिढी बळकट करण्यासाठी होणार आहे. त्या ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या अधिवेशनात कोकणातील विषयावर चर्चा व्हावी. महायुती शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेतला आणि यापुढे ही घेवू. ते पुढे म्हणाले, सावंतवाडी होणाऱ्या अधिवेशनात एक हजारहून परिषदेचे कार्यकर्ते सहभागी होणार आहे. त्यामुळे येथील संस्कृती त्यांच्या माध्यमातून देशभरात पोहोचणार आहे. या ठिकाणी सुरू केलेल्या चळवळीत अनेक विद्यार्थी स्वतः पुढे येत आहेत. ही कौतुकाची गोष्ट आहे. येणाऱ्या काळात अधिवेशन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करू.

या प्रसंगी संघटनमंत्री नीरज चौधरकर स्वागत समिती अध्यक्ष अतुल काळसेकर, सावंतवाडी शहर अध्यक्ष साईनाथ सितावार, शहर मंत्री स्नेहा धोटे, अधिवेशन व्यवस्था प्रमुख चिन्मती खानोलकर संजू परब, अन्नपुर्णा कोरगावकर अजय गोंदावळे, मनोज नाईक, सुधीर आडिवरेकर अजय सावंत, दिलीप भालेकर दिपाली भालेकर मोहिनी मडगावकर डॉ. प्रविणकुमार ठाकरे, शिवाजी भावसार अवधुत देवधर डॉ. शेखर कार्लेकर, महेश सारंग, बंड्या सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page