भास्कर चौगुले:प्रशिक्षणाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
कुडाळ प्रतिनिधी
पिकाच्या उत्पादनामध्ये मातीचे महत्त्व फार मोठे असते. मातीची सुपीकता टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी शासन स्तरावर नेहमीच प्रयत्न केले जातात. त्यासाठी दरवर्षी 5 डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. तालुका कृषी अधिकारी कुडाळ कार्यालयाच्या वतीने जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून तालुकास्तरीय शेतकरी प्रशिक्षण गावराई येथील गिरोबा मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कुडाळ श्री भास्कर चौगले यांनी केले आहे.
