कुडाळ तालुक्यातील वाडोस येथील श्री देव रवळनाथ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या ६ डिसेंबर रोजी होणार आहे.यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यात केळी ठेवणे,नवस फेडणे, नवस बोलणे,रात्री पार्सेकर दशावतार मंडळाचा दणदणीत नाट्य प्रयोग आदी होणार आहेत.यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन समस्त गावकर मंडळी, देवस्थान कमिटी वाडोस व ग्रामस्थांनी केले आहे.