ज्या पद्धतीने विकासासाठी जिल्हा बँक वेग घेतेय त्यात आम्ही नक्की यशस्वी होऊ:मनीष दळवी

पूणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षासह संचालक मंडळाची बँकेच्या प्रधान कार्यालयास भेट

उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला कायमच मान सन्मान

सिंधुदुर्गनगरी(प्रतिनिधी) आपल्यापुढे खूप स्पर्धा आहेत सद्य परिस्थितीत राष्ट्रीयकृत बँका ज्या पद्धतीने ग्राहकांच्या दरवाजात उभ्या राहतात त्यांच्याच दरवाजात पूर्वी ग्राहक उभा रहात होता. अशा स्पर्धा युगात आपण मागे राहून चालणार नाही. यात आपणही पुढाकार घेतला पाहिजे. म्हणून आम्ही डोअर स्टेप बँकिंगचा पहिला प्रयोग सुरू केलाय. बँक सखींची नियुक्ती केली आहे की द्वारे सर्वसामान्य ग्राहकांना तसेच जेष्ठ नागरिकांना बँकेची घरपोच सेवा मिळेल. याला ग्राहकांचा प्रतिसाद मिळतोय. एक मॉडेल म्हणून आम्ही पुढे येतोय. बँकेची २००० कोटीची उलाढाल या तीन वर्षात वाढली ती पुढील दोन वर्षात दोन हजाराने वाढणार आहोत. एकुण ८०००कोटी व्यवसायाचा टप्पा आम्ही गाठणार आहोत.आमचा जिल्हा छोटा असला तरी आम्ही ज्या पद्धतीने विकासासाठी वेग घेतोय त्यात आम्ही नक्की यशस्वी होऊ. राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला जो मानसन्मान मिळतो. जिल्हा बंकेचा चेअरमन म्हणून योग्य मार्गदर्शन त्यांच्याकडून केले जाते .ज्यांना हा महाराष्ट्र आपले कुटुंब वाटते किंवा सिंधुदुर्ग जिल्हा बँक म्हणून आम्हाला जी मदत ते करतात त्यांचा विसर आंम्हाला कधीच पडणार नाही. असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी बँकेच्या ओरोस येथील प्रधान कार्यालयाच्या सभागृहात पूणे जिल्हा बँकेच्या संचालक यांच्या समोर केले पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील काशिनाथ चांदेरे तसेच संचालक मंडळ यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयास सिंधुदुर्ग जिल्हा अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने सोमवारी भेट दिली.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी साहेब यांनी अभ्यास दौऱ्यातील सदस्यांचे स्वागत करुन त्यांना बँकेच्या विविध योजना तसेच बँकेच्या प्रगतीची माहिती दिली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी बोलत होते.
*यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सर्वश्री रेवणनाथ कृष्णाजी दारवटकर, ज्ञानोबा सावळेराम दाभाडे, दत्तात्रय महादेव येळे, संभाजी नारायण होळकर, भालचंद्र गुलाबराव जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, उपसरव्यस्थापक सुनिल खताळ, जिल्हा बँकेचे संचालक समीर सावंत, विद्याधर परब, नीता राणे व संदिप उर्फ बाबा परब तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे साहेब तसेच बँकेचे सरव्यवस्थापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पूणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सर्व उपस्थित संचालक मंडळ जिल्हा बँकेचे मुख्य कार्य अधिकारी या सर्वांचे शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ व गोमेय मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page