महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा सिंधुदुर्ग दौरा भरगच्च कार्यक्रमानी यशस्वी करणार..

राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व अजित पवार गट राष्ट्रवादी कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर १९ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादीची बैठक घेण्यात आली
असून भरगच्च कार्यक्रमानी त्यांचा दौरा यशस्वी केला जाणार आहे अन्यायग्रस्त महिलांचे प्रश्न सिंधुदुर्गनगरी येथे होणाऱ्या बैठकीत सोडविले जाणार आहेत तर वेगुर्ला येथे राष्ट्रवादीचा महिलांचा मेळावा होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची नियोजन सभा सिंधुदुर्गनगरी येथिल शासकीय विधारामगृह येथे पार पडली त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन अबिद नाईक यांनी माहिती दिली यावेळी प्रदेश सचिव सुरेश गवस , महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब ,तालुकाध्यक्ष आर.के.सावंत,प्रांतिक सदस्य विलास गावकर् ,जिल्हा उपाध्यक्ष एम.ङी.सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे,तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर,जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत,तालुकाध्यक्ष उदय भोसले,तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर,प्रांतिक सदस्य बाळा कोयडे ओबीसी जिल्हाध्यक्ष सर्वेक्ष पावसकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष धनराज चव्हाण, सत्यवान गवस,तालुकाध्यक्ष नाथा मालडकर ,तालुकाध्यक्ष वैभव रावराणे,महिला तालुकाध्यक्ष स्नेहल पाताडे, ऋतुजा शेतकटर ,रिद्धी परब , पूजा पेडणेकर, श्रेया मुद्र्स उपस्थित होते
रूपाली चाकणकर सद्या रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोकण दौऱ्यावर असून १७ डिसेंबर पासून दौरा रायगड येथून सुरु झाला आहे या दौऱ्यात महिलांचे प्रश्न सोडवत आहेत बुधवारी १८ डिसेंबरला रत्नागिरी येथून सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवार दिनांक १९ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत जिल्हा नियोजन सभागृहात जिल्ह्यातील अन्याग्रस्त महिलांच्या तक्रारी वर सुनावणी होऊन त्या सोडविल्या जाणार आहेत त्यामुळे जिल्ह्यातील अन्यायग्रस्त महिलांनी पुढे यावे आणि काही अडचण वाटल्यास महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब यांच्याशी संपर्क करावा किंवा थेट येऊन भेटावे असे आवाहन अबिद नाईक यांनी केले आहे
सुनावणी पूर्ण झाल्यावर दुपारी ३ ते ४ या वेळेत अधिकाऱ्यासोबत आढावा बैठक घेणार आहेत त्यानंतर ४ ते ५.३० यावेळेत वेगुर्ला येथील कालेलकर नाट्यगृह येथे राष्ट्रवादी कॉग्रेसचा जिल्हा महिला मेळावा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थित होणार आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत त्याच्या दौऱ्यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले असून हा दौरा यशस्वी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे भरगच्च कार्यक्रमानी दौरा यशस्वी करणार अशी माहिती अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page