आठ दिवसात कारवाई करा,अन्यथा कायदा आम्हाला हाती देऊ नका,वाळू डंपर चालक संघटना आक्रमक
कुडाळ प्रतिनिधी
आमदार निलेश राणे यांच्या संदर्भात आक्षेपार्य सोशल व प्रसिद्धी माध्यमांमध्ये माहिती पसरवणाऱ्यांवर सायबर गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करावा अशी मागणी वाळू आणि डंपर व्यावसायिकांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. येत्या आठवड्यामध्ये ही कारवाई केली जाईल असे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी सांगितले. जर आठ दिवसात कारवाई झाली नाही तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असे वाळू व्यवसायिकांनी सांगितले.
कुडाळ एमआयडीसी येथे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत सर्व डंपर तसेच वाळू व्यवसायिकांची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये वाळू लिलाव संबंधित काही त्रुटी तसेच काही व्यवसायाबाबत असलेल्या समस्यांवर चर्चा करण्यात आली परंतु या बैठकीमधील माहिती चुकीच्या आशयाने सोशल मीडिया व प्रसिद्धी माध्यमातून माहिती पसरवली गेली. पसरवलेली माहिती चुकीची आणि प्रतिमा मल्लीन करणारी आहे. तरी अशा प्रकारची आक्षेपार्य माहिती पसरवणाऱ्या विरोधात सायबर क्राईम नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी व्यावसायिक व नगरसेवक अभी गावडे यांनी सांगितले की, संबंधितांवर येत्या आठ दिवसात कारवाई झाली नाही तर पुढील पाऊल आम्ही उचलू, लवकरात लवकर कारवाई करा. आम्हाला कायदा हाती घेऊ देऊ नका. असे सांगितले. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी सांगितले की, आपण दिलेल्या निवेदनाद्वारे योग्य ती कारवाई केली जाईल, यामध्ये दोषींवर कारवाई करू असे सांगितले यावेळी वाळू डंपर चालक संघटनेचे अध्यक्ष समीर दळवी, अभी गावडे, प्रसन्नजीत दळवी, चेतन पडते, देवेंद्र नाईक, मुन्ना दळवी, आबा धडाम, सुशील कदम आदी वाळू व डंपर व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.