पाच लाख दारूसह स्विफ्ट कार एकूण सात लाखांचा मुद्देमाल जप्त…
बांदा प्रतिनिधी
मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर इन्सुली- सावंतवाडी रोडवर अवैधरित्या मद्याची वाहतूक करताना चौकुळ येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई आज पहाटे करण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल 7.58,000 हजार चा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
गोपाळ गावडे वय 36 राहता सावंतवाडी चौकुळ असे ताब्यात घेणाऱ्या संशयत आरोपीचे नाव आहे. ही कारवाई इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाकडून करण्यात आली आहे.