रुपेश राऊळ:केसरकर व राणे यांच्या वादामुळे सावंतवाडीतील व्यावसायिकांचे मोठे नुकसान याला जबाबदार कोण?
सावंतवाडी प्रतिनिधी
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे लढवय्ये नेते आहेत त्यामुळे जनतेचा विश्वास गमावलेल्या गद्दार दीपक केसरकर यांनी उगाच वायफळ बडबड करून त्यांच्यावर बोलण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे दिला.
तर खासदारांनी दहा वर्षात काय केले असा प्रश्न विचारणाऱ्या केसरकर यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे ते गेले पंधरा वर्षे आमदार आहेत. मंत्री पद ही त्यांच्याकडे आहे मग त्यांनीच सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाच जबाबदारी घेतली पाहिजे होती असेही श्री राऊळ यांनी सांगितले
