खासदार नारायण राणे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती
सिंधुदुर्ग प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या १२ फेब्रुवारी रोजी भाजपचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ओरोस येथे संध्याकाळी ४.३० वाजता या मेळाव्याचे उद्घाटन होईल. या मेळाव्यास खासदार नारायण राणे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मुख्य उपस्थिती असेल. यावेळी जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती ही भाजप जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
