वायंगणी गाव पर्यटनदृष्टय़ा विकसित होत असताना या गावाला सरपंच म्हणून अवि दुतोंडकर सारखे आदर्श सरपंच लाभले आहेत:शिवसेनेचे अतुल बंगे!

कुडाळ प्रतिनिधी
वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी गाव पर्यटन दृष्टीने विकसित होत असताना या ठीकाणी समुद्र किनारा नजीकच असल्याने पर्यटनामुळे इथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध होईल परंतु वायंगणी गावचे सरपंच अवि दुतोंडकर यांच्या मुळेच हे शक्य होत आहे असे गौरवोद्गार शिवसेनेचे नेते अतुल बंगे यांनी काढले!

♦️वायंगणी सुरंग पाणी येथील श्री गवळदेव मित्र मंडळ आयोजित दशावतार कलावंत बाळा सावंत, सरपंच अवि दुतोंडकर, भाजपाचे सुहास खानोलकर पत्रकार आबा खवणेकर यांचा सत्कार श्री बंगे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी श्री बंगे बोलत होते
बंगे बोलताना म्हणाले या मंडळाच्यावतीने दशावतार कलाकार बाळा सावंत यांच्या सारख्या दशावतार कलाकारांची दखल या मंडळाने घेतली हे कौतुकास्पद आहे असे सांगून पत्रकार आबा खवणेकर यांच्या पुढाकाराने आजचा हा कार्यक्रम होत असला तरी या गावचे आदर्श सरपंच श्री अवि दुतोंडकर यांचा सन्मान करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य समजतो असे सांगुन या गावात पक्षीय राजकारण दीसुन न येत नसुन सर्वजण खेळीमेळीच्या वातावरणात गाव विकासासाठी झोकुन देत आहेत असे सांगून बंगे म्हणाले पुढच्या काळात आपण सतत सहकार्याच्या भावनेतून आपण तुमच्या सोबत असल्याची ग्वाही श्री बंगे यांनी दीली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page