कुडाळ प्रतिनिधी
शिवसेनेचे आमदार तथा युवा नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली उद्या तारीख १२ फेब्रुवारीला झाराप येथील भावई मंदिरात सकल हिंदू समाजाच्यावतीने जनजागृती महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सावंत आदींसह अन्य शिवसेनेचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी सर्व हिंदू समाज बांधवांनी सायंकाळी साडेतीन वाजता हॉटेल आरएसएम कुडाळ येथे उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
झाराप येथील भावई मंदीरात आम.निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली महाआरती
