लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक आरोपींची सशर्त जामीनावर मुक्तता

सिंधुदुर्ग प्रतिनिधी
लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे कलम ७, ७अ व १२ अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्याचे कामी अटक असलेल्या आरोपी श्रीम. उर्मिला उमेश यादव व श्री. मणिक भानुदास सांगळे यांची अति. सत्र न्यायाधीश, व्ही. एस. देशमुख यांनी आरोपींनी गुन्ह्याच्या कामी असलेल्या सरकारी साक्षीदारास आमीष दाखवणे, धमकाविणे किंवा वचन देऊन त्यास फितूर करणे असे कृत्य करु नये, आरोपींनी त्यांच्यावर आरोप असलेला गुन्हा पुन्हा करु नये, आपला स्वतःचा व २ नातेवाईकांचा रहाण्याचा पत्ता व फोन नंबर तपासी अंमलदारास सादर करणे, आरोपींनी चार्जशीट दाखल होईपर्यंत आपली कोणतीही मिळकत तबदिल करु नये या अटींवर प्रत्येकी रक्कम रु. ५०,०००/- च्या जातमुचलक्यावर व जामीनावर मुक्तता करण्याचा आदेश केला. आरोपी तर्फे ॲड.अजित भणगे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. मिहीर भणगे, ॲड स्वप्ना सामंत,ॲड सुनिल मालवणकर, ॲड तेजाली भणगे व ॲड आशुतोष कुळकर्णी यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page