यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे
सिंधुदुर्ग प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा मुवथाई, थाई बॉक्सिंग असोसिएशन, सिंधुदुर्ग तर्फे घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेत कुडाळ, ओरोस, कट्टा मधील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. राजमाता जिजाऊ सभागृह ओरोस येथे ही परीक्षा पार पडली.
सदर परीक्षेमध्ये वेदा परब ,देव पालकर यांना येलो बेल्ट तर मंथन मठकर, माही मठकर, ओम बांबर्डेकर, विभा कोरगावकर, हेरंब नार्वेकर, दिव्या आगलावे, पौर्णिमा सकट यांना ऑरेंज बेल्ट प्राप्त झाला.
पियुष रासम, प्रज्ञा राणे, गौरी लांजेकर, गुंजन कारेकर, व स्पृहा सावंत यांना ब्लू बेल्ट प्राप्त झाला.
मारिया अल्मेडा, वेदा परुळेकर, काव्य दळवी, लिनांशा नाईक, सान्वी सावंत, श्रीकृष्ण भोई यांना ग्रीन बेल्ट मिळाला.
सरिषा चव्हाण, आर्या पाटकर, रिद्धी कांबळी, मयूर चव्हाण यांना पर्पल बेल्ट प्राप्त झाला.
मधुरा खडपकर व किमया चव्हाण यांना ब्राउन थर्ड बेल्ट तर सुरज काळे, पार्थ बालम, रश्मी रासम यांना ब्राउन सेकंड बेल्ट प्राप्त झाला.
यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक मृणाल मलये व चित्राक्षा मूळये व संस्थेचे मुख्य प्रशिक्षक लेफ्टनंट विवेक राणे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे श्री शिवाजी नाट्य मंदिर दादरचे अध्यक्ष, माजी खासदार ब्रिग्रे. सुधीर सावंत यांनी अभिनंदन केले. यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.
