अनधिकृत बांधकाम विरोधात कारवाईसाठी कुडाळ पंचायत समिती कार्यालयासमोर रमेश सावंत यांचे उपोषण…

माणगाव ग्रामपंचायतच्या दोष पात्र व भ्रष्ट कारभार करणाऱ्या कारवाई करा

कुडाळ प्रतिनिधी
तालुक्यातील माणगाव येथील ग्रामपंचायतच्या भ्रष्ट व दोष पात्र कारभार करणाऱ्या अधिकारी व लोकसेवक यांच्यावर कार्यवाही करावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते रमेश सखाराम सावंत (मुक्काम पोस्ट – माणगाव – बंदिचे माड, तालुका – कुडाळ, जिल्हा – सिंधुदुर्ग) यांनी बेमुदत उपोषण छेडले आहे. कुडाळ येथील गटविकास अधिकारी कार्यालयाच्या गेट समोर त्यांनी सदर उपोषण सुरू केले आहे.

दरम्यान आपल्या उपोषणा संदर्भात रमेश सावंत म्हणतात, मी रमेश सखाराम सावंत, गटविकास अधिकारी वर्ग एक यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणादरम्यान माझे मागणे सादर करीत आहे. – तब्बल दहा वर्ष अनधिकृत बांधकाम कार्यवाहीसाठी गाव, तालुका, जिल्हा, विभाग ते महाराष्ट्राच्या मंत्रालयापर्यंत सुमारे 15 ते 18 उपोषण केले. ग्राम विभागाचा दोष पात्र व भ्रष्ट कारभार जनतेसमोर आणला. काही कालावधीनंतर थोडाफार न्याय मिळाला. परंतु उर्वरित न्याय मिळावा याकरिता मी सदर उपोषण छेडले आहे. उपोषणादरम्यान माझ्या मागण्या पुढील प्रमाणे –

१ – कार्यरत माणगाव सरपंच व सदस्य यांचेवर कलम ३९ (१) नुसार निलंबनाचे कार्यवाही करावी.

२ – श्री. अनिल सावंत यांचे चालू असलेले अनधिकृत बांधकाम काढून टाकावे.

३ – अनधिकृत इमारत प्रकरणी दोषी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कार्यालयीन कार्यवाही करावी.

४ – ज्या ग्रामपंचायत अधिकारी व लोकसेवकांनी फौजदारी गुन्ह्यात गुन्ह्यास पात्र असे काम केले आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.

सदर मागण्या ग्रामपंचायत अधिनियमानुसार राष्ट्र व योग्य आहेत याचे सबळ पुरावे माझ्याजवळ आहेत. आवश्यक पडल्यास आपणास सर्वांसमोर एकत्र येण्याची विनंती करून ते मी आपल्या माध्यमांतून जनतेसमोर व वरिष्ठ प्रशासनासमोर सादर करीन. तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ अर्थात मीडियाद्वारे मला व माझ्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी आपण या उपोषणाला छेडले असल्याचे उपोषणकारते रमेश सखाराम सावंत यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page