सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार सौ.अश्विनी पाटील यांनी मंगळवारी स्वीकारला. त्यांनी सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभाग हाती घेतल्यानंतर सर्व विभागाच्या पदाधिकाऱ्यांची तात्काळ बैठक घेतली या वेळी आपल्या कामाची पद्धत त्यांनी स्पष्ट केली.
सावंतवाडी स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी अमोल साटेलकर, सुनील पेडणेकर, संदीप धुरी, राजु कासकर, महेश पांचाळ, अजित सांगेलकर, विजय कदम, कृतिका कोरगावकर, बंटी जामदार, श्रद्धा धारगळकर व संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते
