शिरशिंगे गावात गवा रेड्याचा दिवसाढवळ्या वावर,ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

.

गवा रेड्याच्या हल्ल्यात राणेवाडीतील स्वप्निल सावंत किरकोळ जखमी

सावंतवाडी प्रतिनिधी

तालुक्यातील शिरशिंगे येथे गवा रेड्याच्या हल्ल्यात राणेवाडीतील स्वप्निल सुनील सावंत हा किरकोळ जखमी झाला.
याबाबतची अधिक माहिती अशी की, स्वप्निल सावंत हा वर्ले येथून आपल्या गावी शिरशिंगे येथे आपल्या दुचाकीवरून परतत असताना सकाळी ८.३० च्यासुमारास शिरशिंगे जलमदेव परिसरात गवा अचानक रस्त्यावर आला व समोरून येणाऱ्या दुचाकीस्वार स्वप्निल वर हल्ला केला. या हल्ल्यात स्वप्नील च्या पायाला मुका मार लागला असून त्याला नजीकच्या दवाखान्यात येथील स्थानिक युवक कुसाजी मेस्त्री,आकाश निकम, वल्लभ राऊळ,सोमा मेस्त्री यांनी स्वप्निल ला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते.
स्वप्निलच्या पायाला मुका मार लागल्याने पाय सुजला आहे.
याबाबतची माहिती गावचे पोलीस पाटील गणू राऊळ यांनी वन विभागाला कळवल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वप्निलच्या घरी भेट घेतली व पाहणी केली मात्र त्याला कोणतीही आर्थिक मदत केलेली नाही.
दिवसाढवळ्या गव्याच्या वावरामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन यावर योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी गावचे सरपंच दीपक राऊळ पोलीस पाटील गणू राऊळ यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page