कुडाळ (प्रतिनिधी)
पाट पंचक्रोशीत अनेक कबड्डी पटूंनी नाव कमविले त्यातच जिवलग मित्र मंडळाने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करुन खेळाडूंना प्रोत्साहनच दीले आहे असे गौरवोद्गार शिवसेनेचे अतुल बंगे यांनी काढले
पाट जळवी वाडी येथे जिवलग मित्र मंडळ आयोजित जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी श्री बंगे बोलत होते ते बोलताना म्हणाले जिवलग मित्रमंडळाने ही स्पर्धा निस्वार्थी भावनेने भरुन तरुणांनी खुप मेहनत घेऊन ही स्पर्धा भरवुन तरुण खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे असेही श्री बंगे यांनी सांगितले यावेळी कार्यक्रमाला व्यासपीठावर पानवळ बांदा हायस्कूल चे प्रा शरद शिरोडकर पाट ग्रामपंचायत सदस्या विभा खोर्जुवेकर, मालवण बंदर निरीक्षक श्री अनंत गोसावी, निवृत्त पोलीस सुहास पाटकर, पाट हायस्कूल मुख्याध्यापक श्री राजु हंजनकर, पाट शिवसेना उपविभाग प्रमुख महेश वेळकर, निवृत्त पोलीस गुरुदास तेली, विजय गोवेकर, विजय खोर्जुवेकर, काका पाटकर, पोलीस पाटील विशाल चव्हाण, नितीन सकपाळ, प्रास्ताविक पाट हायस्कूल शिक्षक श्री राजन मयेकर यांनी केले
पाट गावातील जिवलग मित्र मंडळाची तरुणांसाठी कबड्डी स्पर्धा म्हणजे खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी;शिवसेनेचे अतुल बंगे
