बिडवलकर हत्तेचा योग्य तपास करून आरोपींना जेरबंद करणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन.

जिल्ह्यात सुरू असलेले अवैद्य धंदे व अवैद्य प्रकार रोखण्यासाठी कडक पाऊल उचलण्याचे मनसे कडून आवाहन:उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर.

कुडाळ प्रतिनिधी
दोन वर्षांपूर्वी घडलेल्या सिद्धिविनायक बिडवलकर हत्याप्रकरणी योग्यरीत्या तपास करून आरोपींना जेरबंद करणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व त्यांचे सहकारी निवती पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री भीमराव गायकवाड यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग सर्व पदाधिकारी यांच्याकडून विशेष अभिनंदन. या हत्या प्रकरणातील काही आरोपी हे सत्ताधारी राजकीय पक्षाशी निगडित असताना तसेच आरोपींचे पोलीस खात्यातील काहींशी सलोख्याचे संबंध असूनसुद्धा कोणताही दबाव न बाळगता तसेच योग्यरीत्या गोपनीयता बाळगून सदर हत्या प्रकरण योग्यरित्या हाताळत सर्व प्रमुख आरोपींना जेरबंद केले हे यात विशेष आहे.
मनसेची जिल्हा पोलीस अधीक्षकांना विनंती आहे की सध्याच्या परिस्थितीत बिडवलकर खून प्रकरण त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देत असताना या खुन प्रमाणात होणारे राजकारण याकडे दुर्लक्ष करून तसेच राजकीय दबावाला बळी न पडता सिंधुदुर्गच्या युवा पिढीला मोठी आर्थिक आमिषे दाखवत वाम मार्गाला लावून त्रासदायक ठरणाऱ्या या समाजविघातक कृतींना ठेचण्यासाठी आपल्या ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ पोलिसी ब्रीदवाक्याला अनुसरून म्हणजे चांगल्याच रक्षण करणे आणि वाईटाचा नायनाट करणे या धर्मानुसार काम करावे.
आणि या कामी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र सैनिक पोलीस प्रशासनाला सर्वतोपरी सहाय्य करेल अशी ग्वाही मनसे उपजिल्हाध्यक्ष यांनी आपल्या पत्रकातून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page